Latest

बीड : गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून आणि नंतर पतीची आत्महत्या

backup backup

नेकनूर (जि. बीड), पुढारी वृत्तसेवा

येथून जवळच असलेल्या – वैतागवाडीमध्ये पती – पत्नीचा मृतदेह गुरुवारी ( दि . १७ ) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. काल  मृतदेहांचे उत्तरीय तपासणी अहवाल पोलिसांना मिळाले असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिल्यांदा पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. आणि नंतर पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे राजेश जगदाळे ( वय -२५ ) व त्यांची पत्नी दिपाली राजेश जगदाळे (वय २०) या दाम्पत्याचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती.

नेकनूर पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल आले असून यात दीपालीचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. हा प्रकार पती – पत्नीच्या वादातून घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दीपालीचा 11 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ती सात महिन्यांची गर्भवती ही होती. आता या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT