Latest

काळजी घ्या ! मराठवाडा, विदर्भात चार दिवस वादळी वार्‍यासह पावसाचे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिमालयात तयार होणारे नवे दोन पश्चिमी चक्रवात अन् विदर्भ-मराठवाड्यापासून कर्नाटकपर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पुन्हा चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यात सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज आहे. हिमालयात या कालावधीत लागोपाठ दोन नवे पश्चिमी चक्रवात सक्रिय होत असल्याने पूर्वोत्तर भारतात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमालयपासून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतात वादळी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ अन् मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने या भागात गुरुवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात एकच दिवस 19 मार्च रोजी पावसाचा अंदाज आहे.

या आठ जिल्ह्यांत जोरदार पाऊस

विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अन् मराठवाड्यातील नांदेड अशा आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

रविवारचे राज्याचे कमाल-किमान तापमान

सोलापूर 40.2 (23.2), पुणे 35.4 (15.6), जळगाव 36.6 (18), कोल्हापूर 35.9 (21.2), महाबळेश्वर 30 (18), मालेगाव 37.4 (16.2), नाशिक 34.2 (16.6), सांगली 37.1 (20.1), सातारा 35.4 (17.7), धाराशिव 38.4 (22.4), छत्रपती संभाजीनगर 36 (18.3), परभणी 37.2 (21.7), नांदेड 37.2 (22.8), अकोला 39.2 (21.4), अमरावती 37.4 (23), नागपूर 35.6 (21.6).

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT