Latest

सौरभ गांगुलींकडून कोहलीला दणके सुरुच ! रोहितला कॅप्टन करताच आता आणखी एक जबरी टोला

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क

बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीच्या (virat kohali) जागी रोहित शर्माला वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (sourav ganguly) यांनी रोहित शर्माबाबत (rohit sharma) मोठे वक्तव्य केले आहे. गांगुली यांनी एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार रोहितचे उघडपणे समर्थन केले आहे.

रविवारी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी एक मोठे विधान करत रोहितला ठळकपणे पाठिंबा दर्शवल्याचे चित्र आहे. त्यामुळे विराटचे चाहते काहीसे नाराज असल्याची चर्चा असून रोहित कर्णधार होताच बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी सुर बदलल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (Sourav Ganguly vs Virat Kohli)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली (Sourav Ganguly vs Virat Kohli) म्हणाले, 'काही वर्षांपूर्वी खेळलेल्या आशिया कपमध्ये (२०१८) रोहितच्या नेतृत्वाखाली संघाला विजय मिळाला होता, विराट कोहली त्या संघात नव्हता. कोहलीशिवाय संघ जिंकला, यावरून रोहितच्या नेतृत्वाखाली आमचा संघ किती मजबूत होता हे दिसून येते'

'रोहित शर्मा एक महान कर्णधार आहे तेव्हाच निवडकर्त्यांनी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. तो संघाला खूप पुढे नेईल. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने आयपीएलमध्ये पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. रोहितने मोठ्या स्पर्धेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यांच्याकडे एक उत्तम संघ आहे आणि आशा आहे की टीम इंडिया पुढे जाऊन खूप यश मिळवेल', असाही गांगुलींनी यावेळी विश्वास व्यक्त केला. (Sourav Ganguly vs Virat Kohli)

गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की, 'रोहितला कर्णधार बनवण्याचा निर्णय बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी संयुक्तपणे घेतला आहे. बीसीसीआयने विराटला टी-20 चे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते, पण त्याने तो मान्य केला नाही. परिणामी रोहित शर्माला टी 20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वेगळे कर्णधार नसावेत, असे निवडकर्त्यांचे मत होते. त्यामुळे रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार घोषित करण्यात आले', असे त्यांनी म्हटले. (Sourav Ganguly vs Virat Kohli)

विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआय आणि सौरव गांगुली यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. बीसीसीआयने कोहलीला वनडेच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने बीसीसीआयच्या निवड समितीने त्याला या पदावरून हटवले. निवड समितेचा निर्णयानुसार यापुढे विराट कसोटी कर्णधार राहणार असून रोहित वनडे, टी-२०ची कमान सांभाळणार आहे.

विराट कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे रेकॉर्ड उत्कृष्ट राहिले आहे. विराटने भलेही आयसीसी ट्रॉफी जिंकली नसेल पण त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवण्याचा विक्रम अप्रतिम आहे. विराटने ९५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी ६५ सामने संघाने जिंकले तर २७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या दरम्यान टीम इंडियाची विजयाची टक्केवारी ७०.४३ होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT