Latest

BCCI Annual Income : गतवर्षी बीसीसीआयने केली छप्पर फाडके कमाई; आकडे पाहून तुम्ही सुद्धा व्हाल थक्क…

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, हे आता तुम्हाला माहीत आहे. टीम इंडियाची अलीकडची कामगिरी काहीही असो, पण मोठ्या कंपन्या टीम इंडियासोबत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडच्या काळात बीसीसीआयकडे इतका पैसा आला हे की इतर मंडळांना बीसीसीआयचा हेवा वाटू लागला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला बीसीसीआयचे वर्षागणिक वाढणारे उत्पन्न अजिबात रुचत नाही. विशेषत: या वर्षी टीव्हीच्या हक्कांची विक्री झाल्यानंतर बीसीसीआये छप्पर फाडके कमाई करत अनेक क्रिकेट मंडळांना बीसीसीआने कुठल्या कुठे मागे सोडले आहे. मात्र, गेल्या वर्षी बीसीसीआयसह इतर देशांच्या बोर्डांनी मिळून वर्षभरात किती कमाई केली, हे तुम्हाला माहीत आहे का ? (BCCI Annual Income)

क्रिकेट मंडळांच्या कमाईचा विचार केला तर दहा देशांपैकी, श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने सर्वात कमी कमाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट मंडळाची 2021 मध्ये एकूण सुमारे 100 कोटी भारतीय रुपये उत्पन्न मिळवले. तर झिम्बाब्वेचे वार्षिक उत्पन्न 113 कोटी होते. विंडीज बोर्ड आठव्या क्रमांकावर राहिला असून त्याने 2021 मध्ये 116 कोटी रुपये कमावले, तर न्यूझीलंडने एका वर्षात 210 कोटी रुपये कमावले आहेत. (BCCI Annual Income)

2021 मध्ये दक्षिण आफ्रिका बोर्डाची वार्षिक कमाई 485 कोटी रुपये होती, परंतु त्याच कालावधीत आश्चर्यकारक म्हणजे बांगलादेशची कमाई तब्बल 802 कोटी रुपये इतकी होती. यावरून बांगलादेशची क्रिकेट अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत किती मजबूत आहे, हे दिसून येते आणि ते चौथ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या (811 कोटी) मागे आहेत. (BCCI Annual Income)

जगातील पहिल्या तीन देशांमध्ये बीसीसीआय बिग बॉस असला तरी पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गत वर्षी 2843 कोटींची कमाई करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 2135 कोटी कमाई केली आहे. तरी देखील हे दोन्ही मंडळ बीसीसीआयपेक्षा खूप मागे आहेत.पण, भारतीय संघाची कामगिरी टी २० विश्वकपप्रमाणे राहिली आणि इंग्लंडचा संघ असाच एक एक करत विश्वचषकांची भर घालू लागला तर इंग्लंड बोर्ड बीसीसीआयच्या जवळ पोहचण्यास वेळ लागणार नाही.

यंदाची भारतीय संघाची कामगिरी तशी सुमारच राहिली आहे. भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचण्यास सातत्याने अपयश येत आहे. तरी दखील बीसीसीआयच्या कमाईत त्याचा परिणाम दिसून येत नाही ही बाब खूपच सकारात्मक आहे. त्यामुळे बीसीसीआयने २०२१ या वर्षभरात तब्बल तीन हजार सातशे तीस कोटींचा महसूल गोळा करुन पहिल्या १० क्रिकेट मंडळांच्या यादीत आपले वर्चस्व अबाधित राखले आहे.


अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT