Latest

BCCI Annual Contract : महिला क्रिकेट संघाला बोर्डाची भेट, खेळाडूंसाठी नवीन करारारची यादी जाहीर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Annual Contract : बीसीसीआयने भारतीय महिला संघाच्या वरिष्ठ खेळाडूंसाठी वार्षिक करार आणि श्रेणी जाहीर केली आहे. गुरुवारी (दि. 27) याची घोषणा करण्यात आली. अ, ब आणि क अशा तीन श्रेणींमध्ये खेळाडूंना विभागण्यात आले आहे.

महिला संघाची कर्णधार हरमप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना 2022-23 हंगामासाठी अ श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. एकूण 17 महिला खेळाडूंना राष्ट्रीय संघासोबत चालू हंगामासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. मात्र, गोलंदाज पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड या वर्षातील पहिल्या श्रेणीच्या करार यादीतून बाहेर पडल्या आहेत.

'ब' श्रेणीमध्ये फक्त शेफाली वर्मा कायम आहे. तर जेमिमा रॉड्रिग्ज आणि रिचा घोष यांना बढती मिळाली असून त्यांच्या सोबत रेणुका ठाकूर, राजेश्वरी गायकवाड यांचा ब श्रेणीत नव्याने समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, पूजा वस्त्राकारची 'ब'मधून क श्रेणीत घसरण झाली आहे. तर पूनम राऊतला यंदाच्या करार यादीत एकाही श्रेणीत स्थान मिळवता आलेले नाही. तर मेघना सिंग, देविका विद्या, सब्भीनेनी मेघना, अंजली सरवानी, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल आणि यास्तिका भाटिया यांना 'क' श्रेणीमध्ये निवडले गेले आहे.

'अ' श्रेणीतील महिला क्रिकेटपटूंना वार्षिक 50 लाख रुपये, 'ब' श्रेणीतील खेळाडूंना 30 लाख रुपये आणि 'क' श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 10 लाख रुपये मिळतील.

भारतीय महिलांसाठी अशा असतील वार्षिक करार श्रेणी :

अ श्रेणी : हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा
ब श्रेणी : रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रीग्ज, शफाली वर्मा, रिचा घोष, राजेश्वरी गायकवाड
क श्रेणी : मेघना सिंग, देविका वैद्य, एस. मेघना, अंजली सरवानी, पुजा वस्त्राकर, स्नेह राणा, राधा यादव, हरलीन देओल, यास्तिका भाटीया

SCROLL FOR NEXT