Latest

BBC Documentary: ‘अतिशयोक्तीने भरलेला माहितीपट’; मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीवर ब्रिटिश खासदाराची प्रतिक्रिया

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: बीबीसीने गुजरात दंगलीवर मोदींविषयी बनवलेला 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' हा माहितीपट अतिशयोक्तीने भरलेला असून, ब्रिटनमध्ये देखील याचा विरोध होऊन टीका होत असल्याचे मत ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी व्यक्त केले आहे. बीबीसी ब्रिटिश सरकारची भूमिका मांडत नाही, तर हे त्यांचे वैयक्तिक मत असून, भारत हा ब्रिटनचा खरा मित्र असल्याचे देखील ब्रिटनच्या या खासदाराने म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, बीबीसीने २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या माहितीपटात प्रोपगंडाशिवाय काहीच नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणार्‍या ढिसाळ पत्रकारितेचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. पण हा माहितीपट बीबीसीने प्रसारित केला नसून, बीबीसीच्या देखरेखीखाली असलेल्या एका बाह्य संस्थेने बनवला असल्याचे मतही या ब्रिटन खासदाराने स्पष्ट केले आहे.

भाजप हा ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षासाठी नैसर्गिक सहयोगी आहे. बीबीसीच्या या माहितीपटात कोणत्याही प्रकारे ब्रिटीश सरकारचा हात नाही. हा ब्रिटन-भारत संबंध बिघडवण्याचा बीबीसीचा अजेंडा असू शकतो. पण या घटनेचा मला अत्यंत खेद असल्याचे ब्रिटिश खासदारांनी स्पष्ट केले आहे.

ब्रिटन खासदाराकडून मोदींचे कौतुक

भारत सरकारने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे उल्लेखनीय काम केले आहे. भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याचे म्हणत ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT