Latest

Bawaal Movie : जान्हवी कपूरने दाखवला आतापर्यंतचा बोल्ड अंदाज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा चित्रपट 'बवाल' रिलीजसाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट काही तासांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. (Bawaal Movie) दरम्यान, वरुण आणि जान्हवीने त्यांच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Bawaal Movie)

या लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर आणि वरुण धवन ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो लूकमध्ये दिसत आहेत. दोघांची केमिस्ट्री इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. जान्हवीने फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस परिधान केलाय. अभिनेता वरुण ब्लॅक शर्ट आणि ट्राउजरमध्ये दिसत आहे.

बवालचे स्क्रिनिंग 

बावलच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित केले होते. स्क्रीनिंगसाठी बोनी कपूर, अर्जुन कपूर, खुशी कपूर आणि अंशुला कपूर उपस्थित होते.

चित्रपट प्रदर्शित कधी होणार?

हा चित्रपट २१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. बावलचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केले आहे. बवालच्या आधी त्यांनी दंगल, छिछोरे आणि चिल्लर पार्टी सारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, बवाल हा चित्रपट पहिल्यांदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याची घोषणा केली. साजिद नाडियादवाला यांच्या नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट या बॅनरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT