जेजुरी : पुढारी वृत्तसेवा
कऱ्हा नदीवर खंडोबा देवाचा पालखी सोहळा सोमवारी (दि. ३०) दुपारी साडे तीन वाजता पोहचला. कऱ्हा नदीवरील पापनाशक तीर्थावर कर्हेच्या पाण्याने देवाला स्नान घातल्यानंतर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
कऱ्हा स्नानानंतर श्री खंडोबा देवाचा सोहळ्याने जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. दिवसभरात एक लाखभर भाविकांनी कऱ्हा नदीवर येऊन देवकार्य केले. रखरखत्या उन्हात खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्याच्या खांडेकरी व मानकरी यांनी अनवाणी पायाने दहा किलोमीटर पालखी खांद्यावर घेऊन पालखी सोहळा साजरा केला.
तब्बल अडीच वर्षांनंतर भाविकांना या उत्सवात सहभागी होण्याचीसंधी मिलाल्याने सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसत होते.