Latest

बांगलादेशमध्‍ये निच्‍चांकी मतदान, शेख हसीनांचे पारडे जड

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विरोधकांनी बहिष्‍कार टाकल्‍यामुळे चर्चेचा विषय ठरलेली बांगलादेशमध्‍ये सार्वजनिक निवडणुकीसाठी
( Bangladesh Election) आज (दि.७) मतदान झाले. देशाच्या इतिहासातील सर्वात कमी मतदानाची नोंद झालीआहे. मतमोजणी सुरु झाली असून, सोमवारी सकाळी लवकर निकाल अपेक्षित आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शरीफुल आलम यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली. विरोधकांच्‍या बहिष्‍कारामुळे पंतप्रधान शेख हसीना यांचा सलग चौथ्‍यांदा सत्ता काबीज करण्‍याचा मार्ग मोकळा झाल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. ( Bangladesh counts votes in low-turnout election )

आज दुपारी ३ वाजता देशभरातील मतदानाची टक्‍केवारी केवळ २७.१५ इतकी होती. 2018 मध्ये झालेल्‍या सार्वजनिक निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी ८० टक्क्यांहून अधिक होती. ( Bangladesh counts votes in low-turnout election )

विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्‍कार टाकल्‍याची घोषणा यापूर्वीच केली. तसेच शेख हसीना सरकारविरोधात भव्‍य मोर्चाही काढला होता. तर नागरिकांना मतदान करुन लोकशाही प्रक्रियेवर विश्वास दाखवावा, असे आवाहन पंतप्रधान शेख हसीना यांनी केले होते. मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ही एक "दहशतवादी संघटना" आहे , असा आरोपही त्‍यांनी केला होता.

Bangladesh Election : विराेधी पक्षांचा मतदानावर बहिष्‍कार

मतदानाविरोध करणार्‍यासाठी मुख्‍य विरोधी बांगलादेश नॅशनिलस्‍ट पार्टीने ( बीएनपी) रविवारपासून दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला होता. बीएनपी पक्षाचे प्रमुख तारिक रहमान यांचे वासतव्‍य सध्‍या ब्रिटनमध्‍ये आहेत. देशातील निवडणूक आयोग बनावट मतांचा वापर करून मतदारांची संख्या वाढवू शकते, असा आरोप त्‍यांनी 'एएफपी' वृत्तसंस्थेशी बोलताना केला होता.

शेख हसीनांच्‍या सत्ता काळात भारत-बांगलादेश मैत्री दृढ

पंतप्रधानपदी पुन्‍हा एकदा शेख हसिना यांची निवड झाल्‍यास भारतासाठी हे सकारात्‍मक संकेत असतील. गेल्या दीड दशकांपासून दोन्ही देशांमधील संबंध सौहार्दपूर्ण आहेत. शेख हसीना यांच्‍या सरकारने भारतविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT