पुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील कावेरी नदीच्या पाण्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२६ सप्टेंबर) बंगळूरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला देण्याच्या निर्णयामुळे कर्नाटकातील अनेक संघटना संतप्त आहेत. त्यामुळे बंगळूर शहरात आज बंद पुकारण्यात आला होता. (Bangalore bandh news)
बंदच्या काळात शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि मल्टिप्लेक्स पूर्णपणे बंद आहेत. बंगळूरमध्ये फक्त रुग्णालये, नर्सिंग होम, बँका, सरकारी कार्यालये आणि मेट्रो सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. कावेरी जल नियमन समितीने १२ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात कर्नाटकला पुढील १५ दिवस तामिळनाडूला दररोज ५००० क्युसेक पाणी देण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयामुळे कर्नाटकातील लोक संतप्त झाले असून, निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत. (bangalore bandh news)
कावेरी नदीतून तामिळनाडूला रोज ५ हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा आदेश कावेरी पाणी वाटप प्राधिकारने दिला आहे. यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २४) मंड्या जिल्हा बंद ठेवण्यात आला होता. आता बंदचे लोण राज्यभरात पसरत चालले असून, आज (दि.२६) बंगळूर बंदची हाक देण्यात आली आहे. (bangalore bandh news)
bangalore bandh news, bangalore news today
बंगळूरमधील ऑटोचालक नसीर खान म्हणाले, "आम्ही विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देतो. कावेरीच्या पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा कर्नाटक कोणालाही पाणी देणार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. येथे फक्त रात्रीचे चालक आहेत, आज ऑटो चालणार नाहीत, आम्ही बंदला पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.