Latest

बंडातात्या सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर; पोलिसांचा चोख बंदोबस्त

backup backup

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने घेतलेल्या वाईनच्या बाबतीतल्या निर्णयावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना साताऱ्यात बंडातात्या यांनी महिला खासदार सुप्रिया सुळे, काही खासदार-आमदार यांच्याविषयी आक्षपार्ह विधान केल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली. गुरुवारी पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हजर होण्यासाठी बंडातात्या स्वतः सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, सुमारे अर्धा तास त्यांची चौकशी सुरू होती.

बंडातात्या शुक्रवारी हजर होणार असल्याने सातारा शहर, सातारा तालुका पोलिस, आरसीपी पोलिसांची एक तुकडी पाचारण करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिस मुख्यालय रस्ता दुपारी १२.३० वाजता बंद करण्यात आला होता. या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली. अचानक यामुळे सातारकरांची तारांबळ उडाली. सुमारे दोनशे पोलिसांचा फौजफाटा असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

गुरुवारी बंडातात्या सह १२५ जणांवर साथरोग अधिनियमन ३ तसेच १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) व १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळी विविध पक्ष, संघटनेच्या महिलांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अशातच राज्य महिला आयोगाने सातारा पोलिसांना या प्रकरणी तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या सर्व पार्श्वभूमीवर बंडातात्या स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले आणि त्यांची चौकशी करण्यात आली.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT