Latest

Paramilitary Forces: निमलष्करी दलातील जवानांना सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करण्यास मज्जाव

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात 'हनी ट्रॅप'च्या घटनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता निमलष्करी (Paramilitary Forces) दलांनी सतर्क राहण्याचे निर्देश जवानांना दिले आहेत.'सीआरपीएफ'ने आदेश जारी करीत जवानांना समाज माध्यमांवर व्हिडिओ आणि फोटो अपलोड करण्यावर बंदी घातली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या 'इनपुट' नंतर निमलष्करी दलांनी सावध पवित्रा घेत जवानांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील सुरक्षा दलांनी दिला आहे.

केंद्रीय पोलीस दलाने समाजमाध्यमांवर कुणासोबतही ऑनलाईन मैत्री न करण्याचे तसेच कुणालाही मैत्री करीता विनंती न पाठवण्याचे आदेश दिले आहेत. हनी ट्रॅप आणि गोपनीय माहिती बाहेर पडण्याचा धोका असल्याने हे पावले उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. अनेक जवान संवेदनशील ठिकाणांवरून त्यांच्या वर्दीतील फोटो आणि व्हिडिओ अपलोड करीत असल्याची बाब गुप्तचर यंत्रणेच्या एका अहवालातून समोर आली होती. काही जवान समाज माध्यमांवरील वापरकर्त्यांना संदेश तसेच मैत्रीसाठी विनंती पाठवत असल्याची बाब उघडकीस आली होती. (Paramilitary Forces)

अशात सर्व अधिकाऱ्यांनी अधिनस्थ जवानांना त्यांच्या समाज माध्यमांवर गणवेशातील फोटो अथवा व्हिडिओ पोस्ट करू नये, यासंबंधीची काळजी घ्यावी, असे आदेश दिले आहेत. बीएसएफ तसेच आयटीबीपीने देखील त्यांच्या सैनिकांना संवेदनशील ठिकाणांवरून फोटो अपलोड न करण्याचे तसेच अज्ञातांसोबत मैत्री न करण्याचे आदेश दिले आहेत. विशाखापट्टनम स्टील प्लॉंटमध्ये तैनात असलेल्या सीआयएसएफ जवान पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेतील महिला अधिकाऱ्यांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Paramilitary Forces : दिल्ली पोलीस दलाचीही कर्मचाऱ्यांना सूचना

कुठलाही संशयित अथवा अटकेतील व्यक्तीच्या गुन्ह्यासंबंधी अथवा खटल्यासंबंधी कुठलीही माहिती पोस्ट न करण्याचे आदेश दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोडा यांनी दिले आहेत. पीडित, संशयित अथवा कुठल्या समाजाबद्दल अवमानकारक कुठलीही पोस्ट पोलिसांनी करू नये, असे अरोडा यांनी आदेशातून सांगितले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना समाज माध्यमांचा वापर करू नये, तसेच संवेदशील माहिती समाज माध्यमांवर अपलोड करू नये, असेही आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT