Latest

AUS vs SA : आफ्रिकेचे ऑस्ट्रेलियाला ३१२ धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क :प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० ओव्हरमध्ये सात गडी गमावून ३११ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने १०६ बॉलमध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली. त्याच्यासह एडन मार्करमने अर्धशतक (५६) झळकावले. तर कर्णधार बवुमा (३५), क्लासेन (२९), व्हॅन डर डुसेन (२६), मार्को (२३ ) आणि मिलर (१७) यांनी धावांचे योगदान दिले. डेथ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत आफ्रिकेला ३११ धावांत रोखले.

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार टेंबा बावुमा आणि क्विंटन डी कॉक यांच्यात पहिल्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी झाली. बावुमा ३५ धावा करून बाद झाला. यानंतर डी कॉकने रॅसी व्हॅन डर ड्युसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. डुसेनही २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डी कॉकने झंझावाती खेळी खेळली आणि ९० बॉलमध्ये शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील १९वे शतक होते आणि या वर्ल्डकपमधील सलग दुसरे शतक होते. डी कॉकने श्रीलंकेविरुद्ध १०० धावांची इनिंग खेळली होती.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. यांच्यासह जॉश हेझलवूड, पॅट कमिंन्स आणि ऍडम झॅम्पा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३१२ धावांचे लक्ष्य आहे.

 (AUS vs SA)

संघ :

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शमसी

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

<

/p>

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT