Latest

AUS vs PAK : ‘पाकिस्‍तान जिंदाबाद’ च्या घोषणा देताना ‘त्‍या’ चाहत्‍याला पोलिसाने रोखले; अन्.. व्हिडिओ व्हायरल

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : पाकिस्‍तान आणि ऑस्‍ट्रेलिया दरम्‍यान बेंगलुरूच्या एम चिन्नास्‍वामी स्‍टेडियम मध्ये शुक्रवारी वर्ल्‍ड कप 2023 चा १८ वा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्‍यान एका चाहत्‍याने नापसंती व्यक्‍त केली. मैदानात पाकिस्‍तानच्या समर्थनार्थ घोषणा देताना चाहत्‍याला रोखण्यात आले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्‍यामध्ये एका व्यक्‍ती जवळ पोलिस जातो आणि त्‍याला पाकिस्‍तान जिदाबादच्या घोषणा देताना त्‍याला रोखतो.

पाकिस्‍तानला शुक्रवारी वर्ल्‍ड कप 2023 मध्ये सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. बेंगलुरूच्या चिन्नास्‍वामी स्‍टेडियमवर ऑस्‍ट्रेलियाच्या हातून पाकिस्‍तानला ६२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

ऑस्‍ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 45.3 षटकांत 305 धावांत आटोपला. मात्र, या पराभवाने पाकिस्तान संघाची निराशा झाली असली, तरी त्याचा एक चाहता मात्र वेगळ्या कारणांमुळे नाराज होता.

सामन्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबादचा नारा लावण्यापासून रोखण्यात आल्याने एका पाकिस्तानी चाहत्याने निराशा व्यक्त केली. पाकिस्तानचा संघ बॅटींग करताना ही घटना घडली. एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याने चाहत्याला पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यापासून रोखल्याचे दिसत आहे. यावेळी हा पाकिस्‍तानचा चाहता आणि पोलिसात बाचाबाचीही झाली.

यावेळी पाकिस्‍तानी चाहता म्‍हणाला, माझ्या आजुबाजुला उभारलेले भारतीय चाहते भारत माता की जय च्या घोषणा देत आहेत. तर मग मलाच माझ्या देशाच्या घोषणा देताना का रोखले जात आहे. चाहत्‍याने सांगितले की, मी माझ्या पाकिस्‍तानी संघांच्या समर्थनासाठी पाकिस्‍तानहून येथे आलो आहे. यानंतर काही वेळाने पोलिस या ठिकाणाहून निघून जातो.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT