पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia Vs England ODI) यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळला गेला. यजमान कांगारू संघाने टॉस जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने इंग्लंडची सुरुवात खराब झाली. 31 धावांवर त्यांनी तीन विकेट्स गमावल्या. यातील दूसरी विकेट खूप महत्त्वाची होती. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सुरेख चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला क्लीन बोल्ड केले. स्टार्कने ज्याप्रकारे रॉयच्या दांड्या गुल केल्या हा अनुभव डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच होता. (Mitchell Starc Inswinger jason roy clean bowled)
पॅट कमिन्स (pat cummins) आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिल्या पाच षटकांत इंग्लंडचे सलामीवीर फिल सॉल्ट (14) आणि जेसन रॉय (6) यांना बाद केले. मिचेल स्टार्कने स्फोटक फलंदाज जेसन रॉयला त्याच्या इनस्विंगरचा शिकार बनवले. स्टार्कच्या आक्रमणाला जेसनकडे उत्तरच नव्हते. ही विकेट पहिल्या डावाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले. स्टार्क वनडे क्रिकेटमध्ये रॉयला सहाव्यांदा बाद केले आहे. यानंतर क्विंटन डी कॉक, जॉनी बेअरस्टो आणि उमर अकमल यांचा क्रमांक लागतो, ज्यांना स्टार्कने चार वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. जेसन रॉयच्या या बोल्ड आउटिंगवर ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. जाणून घेऊया यावर चाहते काय म्हणाले? (Mitchell Starc Inswinger jason roy clean bowled)
इंग्लंडच्या डावाची पाचवे षटक स्टार्क (Mitchell Starc Inswinger) फेकत होता. स्टाईकवर जेसन रॉय होता. षटकातील दुसरा चेंडू स्टार्कने गुड लेन्थ इन्स्विंगर टाकला. हा चेंडू खेळपट्टीवर पडताच क्षणार्धात रॉयच्या बॅट आणि पॅडच्या चिंचोळ्या जागेतून विकेटवर आदळला आणि इंग्लिश सलामीवीर रॉय क्लिन बोल्ड झाला. या चेंडूवर खेळताना रॉय अवाक झाला. पुढे जायचे की मागे राहायचे या संभ्रमात तो पडल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. रॉयला खराब फॉर्ममुळे इंग्लंडच्या टी 20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले होते आणि आताही त्याचा खराब फॉर्म कायम असल्याचे आजच्या सामन्यावरून दिसत आहे. (Mitchell Starc Inswinger jason roy clean bowled Australia Vs England ODI)
इंग्लंड क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 48 षटकांत 276/8 धावा केल्या होत्या. अवघ्या 66 धावांत चार विकेट गमावल्याने पाहुणा संघ अडचणीत सापडला होता, पण डेव्हिड मलान (134)ने शानदार फलंदाजी करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले (Australia Vs England). मलानच्या 128 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने केलेल्या 134 धावांच्या शतकी खेळीमुळे संघाला 50 षटकात 9 गडी गमावून 287 धावा करता आल्या. मलाननंतर जोस बटलर (29) आणि विली (34*) यांनी सर्वाधिक धावा केल्या. दुसरीकडे, कमिन्स आणि अॅडम झाम्पा यांनी ऑस्ट्रेलियाकडून शानदार गोलंदाजी करत 3-3 विकेट घेतल्या. यात कमिन्सने 62 तर झाम्पाने 55 धावा दिल्या.तर मार्कस स्टॉइनिस आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी एक गडी बाद केला.