Latest

Attack On Hindu Temple : कॅनडात खलिस्तान्यांकडून हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Attack On Hindu Temple : कॅनडात खलिस्तान समर्थकांकडून पुन्हा एकदा हिंदू मंदिरांवर हल्ला चढवण्यात आला आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील आहे. मंदिरावर नुकत्याच मारल्या गेलेल्या खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.

ज्या मंदिरावर हल्ला करण्यात आला ते लक्ष्मी नारायण मंदिर आहे. ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील हे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. मंदिराच्या गेटवर खलिस्तानी मताचे संग्रहित पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याचे देखील चित्र लावण्यात आले आहे. तसेच पोस्टरवर लिहिण्यात आले आहे की, कॅनडा 18 जूनच्या हत्येच्या घटनेतील भारताच्या भूमिकेचा तपास करत आहे.

Attack On Hindu Temple : कोण होता हरदीप सिंह निज्जर

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर, सरेच्या गुरुनानक सिख गुरुद्वारा साहिब चा प्रमुख होता. गुरुद्वारा परिसरात 18 जूनच्या सायंकाळी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याची गोळी मारून हत्या केली होती. हरदीप सिंह निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता.

हिंदू मंदिरावरील हल्ल्यांची वर्षभरातील तिसरी घटना

कॅनडात हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वर्षातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 31 जानेवारीच्या कॅनडाच्या ब्रॅम्पटन भागातील एका प्रसिद्ध हिंदू मंदिरावर हल्ला चढवण्यात आला होता. तसेच त्यावर भारत विरोधी नारे लिहिण्यात आले होते. यावर कॅनडात राहणाऱ्या भारतीय समुदायाने निषेध केला होता. ब्रॅम्पटनचे महापौर पॅट्रिक ब्राऊन यांनी देखील या हल्ल्याची निंदा केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये कॅनडाच्या ओंटारियातील एका हिंदू मंदिरावर हल्ला चढवला होता. त्यांचे आरोपही खलिस्तान समर्थकांवर लावण्यात आले होते. तसेच कॅनडातील भारतीय दुतावासाने देखील याचा निषेध नोंदवला होता.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT