Canada Plain Crash : कॅनडाच्या अलबर्टामध्ये विमान कोसळून ६ जणांचा मृत्यू

Canada Plain Crash
Canada Plain Crash

पुढारी ऑनलाइन डेस्क : Canada Plain Crash : कॅनाडाच्या अलबर्टामध्ये विमान कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅनडाच्या पोलिसांनी याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अलबर्टा प्रांतातील कॅलगरीच्या पश्चिमेला एका लहान विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी सांगितले की, पायलट आणि पाच प्रवाशांसह विमानाने स्प्रिंगबँक विमानतळावरून उड्डाण केले आणि सॅल्मन आर्म, ब्रिटिश कोलंबियाकडे निघाले होते.

तर ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे विमान सिंगल-इंजिन पाईपर पीए-32 होते आणि बोर्ड अपघाताची चौकशी करत आहे.

Canada Plain Crash : कोसळलेल्या विमानाचा शोध सुरू

पोलिसांनी सांगितले की, रॉयल कॅनेडियन एअर फोर्सचे हर्क्युलस विमान कोसळलेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. या शोधकर्त्यांनी ते कॅलगरीच्या पश्चिमेला माउंट बोगार्ट पर्वताचा तब्बल 60 किलोमीटरचा परिसर त्यांनी शोधून काढला. पाठवण्यात आलेले हर्क्युलस क्रू आणि अलबर्टा पार्क्स माउंटनच्या बचाव पथकाने घटनास्थळी कोणीही जिवंत राहिले नसल्याची पुष्टी केली.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news