Latest

अतिक-अशरफ हत्येनंतर कोणते उपाय योजले; सुप्रीम कोर्टाची उत्तर प्रदेश सरकारला विचारणा

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर कोणकोणते उपाय योजण्यात आले, याची माहिती सादर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले.

अतिक आणि अशरफ यांच्या हत्येच्या दोन दिवस आधी 13 एप्रिल रोजी अतिकचा मुलगा असद याचे उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने झाशीजवळ इनकाउंटर केले होते. या प्रकरणाचा अहवाल देखील सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. उत्तर प्रदेशात 2017 सालापासून 183 इनकाउंटर झाले असून त्याची स्वतंत्रपणे चौकशी केली जावी, अशा विनंतीची याचिका अॅड. विशाल तिवारी यांनी दाखल केलेली आहे. सदर याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश निर्गमित केले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT