Latest

अतिक, अशरफ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : गँगस्टर उर्फ राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात यावा, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. अतिक आणि अशरफ यांची गेल्या शनिवारी प्रयागराजमध्ये तीन लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

हत्येचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरु असला तरी पोलिसांच्या समोरच दोघांची हत्या झालेली असल्याने हा तपास सीबीआयकडे सोपविला जावा, असे ठाकूर यांनी याचिकेत म्हटले आहे. याआधी विशाल तिवारी नावाच्या वकिलाने अतिक, अशरफ यांच्या हत्येसह उत्तर प्रदेशात मागील पाच वर्षांत झालेल्या १८३ इनकाउंटर्सच्या चौकशीचे आदेश दिले जावेत, असे सांगत सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तज्ञांच्या समितीमार्फत ही चौकशी केली जावी, असेही तिवारी यांनी याचिकेत म्हटले होते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT