पुढारी ऑनलाईन डेस्क : अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तूळातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. सर्व विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ( Atiq Ahmad Murder Case)
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की,"आपल्या देशाचा कायदा संविधानात लिहिलेला आहे, हा कायदा सर्वोच्च आहे. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे; पण ती देशाच्या कायद्यानुसारच व्हायला हवी. कोणत्याही राजकीय हेतूने कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेशी खेळणे किंवा त्यांचे उल्लंघन करणे आपल्या लोकशाहीसाठी योग्य नाही. जो कोणी असे करतो किंवा असे करणाऱ्यांना संरक्षण देतो, त्यालाही जबाबदार धरले पाहिजे आणि त्याच्यावर कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे."
हेही वाचा