Latest

काळजी वाढवणारी बातमी ! सप्टेंबरअखेर नऊ जिल्हे अवर्षणाच्या छायेत

अमृता चौगुले

पुणे : सप्टेंबरअखेर राज्यात सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, जालना, अकोला, अमरावती हे नऊ जिल्हे अवर्षणाच्या छायेत आहेत. या ठिकाणी सरासरीपेक्षा 21 ते 44 टक्के इतका कमी पाऊस झाला आहे. यंदा फक्त पालघर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नांदेड या चारच जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली असून, उर्वरित सर्वच जिल्ह्यांत पाऊसमान सामान्य राहिले आहे. जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा प्रवास संपवत मान्सून राज्यातून 4 किंवा 5 रोजी परतीला निघत आहे.

यंदा प्रथमच राज्यातील सात जिल्हे सप्टेंबरअखेर अवर्षणाच्या छायेत आहेत. राज्य चार महिन्यांच्या सरासरीत काठावर पास झाले असले, तरीही मुसळधार पाऊस फारच कमी ठिकाणी झाला आहे. दरवर्षी किमान 8 ते 10 जिल्हे अतिवृष्टी, तर 15 ते 18 जिल्हे मुसळधार पावसाचे ठरतात, तर दोन ते तीन जिल्हे अवर्षणाच्या छायेत राहतात. यंदा चित्र वेगळे आहे. कोकणात सरासरीपेक्षा 11 टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 12 टक्के कमी, मराठवाडा उणे 11 टक्के, तर विदर्भ उणे 2 टक्के इतकी सरासरी आहे.

हे नऊ जिल्हे रेड झोनमध्ये
(टक्केवारी) (खूप कमी पाऊस)
सांगली (-44), सातारा (-37),
सोलापूर (-30), बीड(-21), धाराशिव (-21), हिंगोली (-24), जालना (-33), अकोला (-23), अमरावती (-27)
अतिवृष्टीचे 4 जिल्हे
नांदेड (23), पालघर (21), ठाणे (27), मुंबई उपनगर (28)

राज्य सरासरी (सामान्य)
सरासरी ः 994.5
पडला ः 965.7 (3 टक्के कमी)
– कोकण विभाग (अधिक 11 टक्के)
– मध्य महाराष्ट्र (उणे 12 टक्के)
– मराठवाडा (उणे 11 टक्के)
– विदर्भ (उणे 2 टक्के)

विभागवार पाऊस (टक्के)
कोकण : मुंंबई शहर (-5), पालघर (21), रायगड (13), सिंधुदुर्ग (6), मुंबई उपनगर (28), ठाणे (27).
मध्य महाराष्ट्र : पुणे (-6), कोल्हापूर (-16), नगर (-10), सांगली (-44), सातारा (-37), सोलापूर (-30).
उत्तर महाराष्ट्र : धुळे (-9), जळगाव (6), नंदुरबार (-3), नाशिक (3), मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर (-11), बीड (-21), धाराशिव (-24), हिंगोली (-23), जालना (-33), लातूर (-8), नांदेड (23), परभणी (-17).
विदर्भ : अकोला (-23), अमरावती (-27), भंडारा (7), बुलडाणा (-8), चंद्रपूर (3), गडचिरोली (6), नागपूर (5), वर्धा (-3), वाशिम (-15)

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT