Latest

Spacewalk : अंतराळवीर स्पेस वॉक करीत असताना हातातून निसटून गेला टूल बॉक्स!

Arun Patil

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सध्या अनेक अंतराळवीर कार्यरत आहेत. विशिष्ट प्रयोग तसेच स्थानकाच्या डागडुजीसाठी अंतराळवीरांनी स्पेस वॉक केला. स्पेस वॉक करताना स्पेस स्टेशनवर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी स्पेस वॉक करत असताना स्पेस स्टेशनवर ही विचित्र घटना घडली. अंतराळवीर जास्मिन मोघबेली आणि लोरल ओ हारा यांच्यासोबत अनपेक्षित प्रकार घडला. हे दोन अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेरील कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक बॉक्सवर काम करत होते. यावेळी त्यांच्या हातात असलेला टूल बॉक्स हातातून निसटला आणि तो अंतराळात गेला. (Spacewalk)

स्पेस स्टेशनवर स्पेस वॉक सुरू असाताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला. यानंतर या अंतराळवीरांना कमांड देणार्‍या नासाच्या कंट्रोल स्टेशनमध्ये खळबळ उडाली. फ्लाईट कंट्रोलने स्टेशनच्या बाह्य कॅमेर्‍यांचा वापर करून टूल बॅगचे निरीक्षण केले. या विचित्र दुर्घटनेनंतर स्पेस स्टेशनच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, दुर्घटनेमुळे स्पेस स्टेशनला कोणताही धोका नसल्याचे 'नासा'कडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या टूल बॉक्समुळे नेमके किती नुकसान झाले याचे मूल्यांकन केले जात आहे. लवकरच नासातर्फे नुकसानीचा आकडा जाहीर केला जाईल.

तब्बल सहा तास 42 मिनिटे हा स्पेस वॉक सुरू होता. या स्पेस वॉकमध्ये अंतराळवीरांनी सौरऊर्जेसह स्पेस स्टेशन बाहेरील अनेक पार्टचे मेंटेनन्स केले. यावेळी कम्युनिकेशन बॉक्सवर काम करत असतानाच अंतराळवीरांच्या हातातून टूल बॉक्स अंतराळात पडला. फ्लाईट कंट्रोल कॅमेर्‍यात टूल बॉक्स अंतराळात पडत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. काम करत असताना अंतराळवीरांच्या हातातून चुकून हा बॉक्स सुटला. या घटनेला अंतराळवीरांनाच जबाबदार धरण्यात आले आहे. (Spacewalk)

यापूर्वी नोव्हेंबर 2008 मध्येही एक टूलबॉक्स अशाच प्रकारे अंतराळात पडला होता. मात्र, अनेक महिने पृथ्वीभोवती फिरल्यानंतर 2009 मध्ये तो पृथ्वीच्या वातावरणात घुसला आणि जळून खाक झाला. तत्कालीन अहवालानुसार या टूल बॉक्सची किंमत 1 लाख डॉलर इतकी होती. पृथ्वीपासून 400 कि.मी. उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. अमेरिका, रशिया, जपान, युरोपसह 15 देशांच्या अंतराळ संस्थांनी मिळून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापन केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT