Latest

ADR Report : सलग तिसर्‍यांदा निवडणूक जिंकलेल्‍या ७१ खासदारांच्‍या संपत्तीत २८६ टक्‍के वाढ!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : २००९ ते २०१९ असे सलग तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकणार्‍या ७१ खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये तब्‍बल २८६ टक्‍के वाढ झाली आहे, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) या संस्थेने आपल्या अहवाल म्हटलं आहे. विशेष म्‍हणजे प्रत्‍येक खासदाराची संपत्ती सरासरी १७.५९ टक्‍क्‍यांनी वाढली असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे. (ADR Report )

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (एडीआर) या स्‍वयंसेवी संस्‍थेने केलेल्‍या पाहणीतील निष्‍कर्षानुसार, २००९ निवडणुकीपूर्वी अपक्षांसह विविध पक्षांच्‍या उमेदवारांची सरासरी संपत्ती ६.१५ कोटी रुपये इतकी होती. २०१४ मध्‍ये सलग दुसर्‍यांदा निवडणूक जिंकलेल्‍या खासदारांच्या संपत्तीमध्‍ये १६.२३ कोटी रुपयांनी वाढ झाली. तर मागील म्‍हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍या निवडणूक जिंकलेल्‍या ७१ खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये सरासरी २३.७५कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे.

ADR Report : हरसिमरत कौर यांच्‍या संपत्तीमध्‍ये सर्वाधिक वाढ

'एडीआय'ने केलेल्‍या पाहणीत, संपत्ती वाढीतील टॉप 10 मध्‍ये शिरोमणी अकाली दल, राष्‍ट्रवादी काँग्रेस, बीजेडी आणि एआययुडीए पक्षांच्‍या खासदारांचा समावेश आहे. सर्वाधिक संपत्ती वाढीमध्‍ये शिरोमणी अकाली दलाच्‍या भठिंडा मतदारसंघाच्‍या खासदार हरसिमरत कौर बादल अग्रस्‍थानी आहेत. हरसिमरत कौर बादल यांची संपत्ती सर्वाधिक १५७.६८ कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे. विशेष म्‍हणजे, २००९ मध्‍ये हरसिमरत कौर बादल यांची संपत्ती ६०.३१ कोटी रुपये इतकी होती. तर २०१९ मध्‍ये ती २१७.९९ कोटी रुपये इतकी झाली.

टॉप-10 मध्‍ये सुप्रिया सुळेंचेही नाव

संपत्ती वाढ झालेल्‍या टॉप-10 खासदारांमध्‍ये राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या खासदार सुप्रिया सुळे यांचाही नावाचा समावेश आहे. सुळे यांची संपत्ती २००९ मध्‍ये ५१.५३ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्‍ये ही संपत्ती १४०.८८ कोटी इतकी झाली. मागील २००९ ते २०१९ मध्‍ये सुप्रिया सुळे यांच्‍या संपत्तीमध्‍ये ८९.३५ कोटी रुपये इतकी वाढ झाल्‍याचे 'एडीआय'च्‍या पाहणी अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.

वरुण गांधी यांच्‍या संपत्तीमध्‍येही भरघोस वाढ

केंद्रातील सत्ताधारी भाजपचे खासदार पीसी मोहन यांच्‍या संपत्तीमध्‍ये सर्वाधिक वाढ झाली आहे. पीसी मोहन यांनी २००९
मध्‍ये बंगळूर येथून निवडणूक लढवली होती. यावेळी त्‍यांची संपत्ती ५ कोटी इतकी होती. २०१९ मध्‍ये ती ७५ कोटी झाली आहे. यादीतील टॉप10 मध्‍ये समावेश असणार्‍या पीलीभीतचे भाजपचे खादसार वरुण गांधी यांची २००९ मध्‍ये संपत्ती ४.९२ कोटी रुपये इतकी होती. २०१९ मध्‍ये ती ६०.३२ इतकी झाली आहे. तर वरुण गांधी यांच्‍या आई आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची २००९ मध्‍ये संपत्ती १७ कोटी होती ती २००९ मध्‍ये ५५ कोटी इतकी झाली आहे.

भाजप खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये सर्वाधिक वाढ

सलग तीनवेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्‍या भाजप खासदारांच्‍या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. या यादीत सर्वाधिक ४३ खासदार भाजपचे आहेत. २००९ ते २०१९ या कालावधीमध्‍ये या खासदारांच्‍या संपत्तीत सरासरी १५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. संपत्ती वाढीमध्‍ये दुसर्‍या स्‍थानावर काँग्रेसचे खासदार आहेत. काँग्रेसच्‍या १० खासदारांच्‍या संपत्ती २००९ मध्‍ये पाच कोटी होती. ती २०१९ मध्‍ये १६ कोटी इतकी झाली आहे. या यादीत तिसर्‍या स्‍थानांवर तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. तृणमूलच्‍या ७ खासदारांच्‍या संपत्तीमध्‍ये सरासरी पाच कोटींची वाढ झाली आहे. तसेज बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्‍येकी दोन खासदार हे संपत्तीवाढीत अनुक्रमे चौथ्‍या व पाचव्‍या स्‍थानी आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT