Latest

Asian Para Games : अश्विन, दर्पण आणि सौंदर्य त्रिकुटाला पॅरा बुद्धिबळमध्ये सुवर्णपदकाची कमाई

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरीसह पदकांची कमाई सुरूच आहे. दरम्यान, आज (दि.२९) सहाव्या दिवशी अश्विन, दर्पण आणि सौंदर्या या त्रिकूटाने दमदार कामगिरी केली. अश्विन मकवाना, दर्पण इराणी आणि सौंदर्य प्रधान यांनी बी १ श्रेणीतील पॅरा बुद्धिबळ पुरुष संघात सुवर्णपदकाची कमाई केली आहे.  (Asian Para Games)

दरम्यान पुरुषांच्या B1 श्रेणीतील पॅरा बुद्धिबळात दर्पण इराणीने त्याच्या अप्रतिम कौशल्याने सुवर्णपदकावर मोहर उमटवली आहे. सौंदर्य प्रधानने रौप्यपदक तर अश्विन मकवानाने कांस्यपदकाला गवसणी घातली.

Asian Para Games : पदकांची शंभरी पार

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यानंतर आशियाई पॅरा गेम्समध्येही भारतीय खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एक नवा इतिहास रचत भारताने आता पदकांची शंभरी पार केली आहे. भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात आतापर्यंत १०० पदकांवर मोहोर उमटवली आहे. यात २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याआधी २०१८ मध्ये इंडोनेशिया पॅरा गेम्समध्ये भारताने ७२ पदके जिंकली होती.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT