Latest

Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ सहभागी होणार

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांचा पूर्वीचा निर्णय बदलताना भारताच्या पुरुष व महिला संघ आशियाई स्पर्धेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एशियन गेम्स 2023 मध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवले जाणार आहे आणि 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये होणार आहे. याच कालावधीत भारतात वन डे वर्ल्डकप होणार असल्याने आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची बी टीम पाठवणार असल्याचे समोर येत आहे. 5 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत भारतात वन डे वर्ल्डकप होणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत घोषणा मंगळवारी (दि. 27 जून) होणार आहे. (Asian Games 2023)

बीसीसीआय 30 जूनच्या आत भारतीय ऑलिम्पिक समितीकडे पुरुष व महिला संघाची अंतिम यादी पाठवणार असल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. यापूर्वी 2010 व 2014 च्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळले गेले; परंतु बीसीसीआयने संघ पाठवला नव्हता. आशियाई स्पर्धा मागच्या वर्षीच होणार होती; परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलली गेली. जकार्ता येथे 2018 मध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळाचा समावेश नव्हता. आतापर्यंत दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला असताना पुरुषांमध्ये एकदा श्रीलंका आणि एकदा बांगला देशने सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये पाकिस्तानने दोन्ही वेळा विजय मिळवला आहे. (Asian Games 2023)

भारतीय क्रिकेट संघ याआधी 1998 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या वेळी खेळला होता. त्यानंतर भारतीय पुरुष संघ क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळला. त्याचवेळी, दोन भारतीय पुरुष संघ एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी खेळण्याची ही तिसरी वेळ असेल. 1998 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेशिवाय भारताचा एक संघ सहारा कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळत होता. 2021 मध्ये जेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडकडून कसोटी मालिका खेळत होता, तेव्हा दुसरा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौर्‍यावर वन डे, टी-20 मालिका खेळत होता.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT