Latest

Asia Cup KL Rahul : केएल राहुलला शेवटची संधी? टीम कॉम्बिनेशन बिघडल्याची चर्चा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup 2022 : भारताचा सलामीवीर केएल राहुल आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फेल गेला. मैदानात उतरला तेव्हा तो या वर्षातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. तर आयपीएल 2022 नंतर तो तिसऱ्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण भारतीय डावाच्या दुस-याच चेंडूवर तो क्लिन बोल्ड झाला आणि तो गोल्डन डकचा बळी ठरला. अशा परिस्थितीत 31 ऑगस्ट रोजी होणारा हाँगकाँगविरुद्धचा सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. (Asia Cup KL Rahul)

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल (Asia Cup KL Rahul) अपयशी ठरला तर तो प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण प्लेइंग इलेव्हनचे कॉम्बिनेशन गडबडले आहे. टीम इंडियाकडे एकच डावखुरा फलंदाज होता, ज्याची पाकिस्तानविरुद्ध कमतरता भासत होती. पण रवींद्र जडेजाला बढती मिळाली आणि त्याने टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. (Asia Cup 2022)

जर केएल राहुलला वगळले तर ऋषभ पंतला त्याच्या ऐवजी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंत चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो आणि अशा परिस्थितीत एकतर विराट कोहलीला सलामीला पाठवले जाऊ शकते किंवा रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव डावाची सुरुवात करू शकतो. इंग्लंड दौ-यावर रोहितने सूर्याला सलामीवीर म्हणून संधी दिली, ती रणनीती यशस्वी ठरली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT