पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावर मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. "निवेदिता माझी ताई" असे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि एताशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे.
संबंधित बातम्या
प्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. आता नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. पण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहान मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो 'असीम' या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'असीम' हा निवेदिताचा लहान भाऊ आहे. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.
"निवेदिता माझी ताई" या मालिकेचा विषय तितकाच आगळा वेगळा आहे. अभिनेता अशोक फळदेसाई त्याच्या प्रॉमिसिंग अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. तर एताशा संझगिरीनेही याआधी काही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. आता या मालिकेत दोघेही नव्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निवेदिता आणि यशोधन यांच्या नव्या वेषभूषेची चर्चा नक्कीच रंगणार आहे.
भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशा प्रकरचे असेल हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. यामुळे चाहत्याच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.