Latest

Ashok Chavan Join BJP : अखेर अशोक चव्हाण भाजपवासी! फडणवीसांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंगळवारी (दि.१३) भाजपमध्ये प्रवेश केला. काल (दि.१२) त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्त्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज (दि.१३) दुसऱ्याच दिवशी भाजपसोबत नवीन राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. यानुसार अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात आज अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. (Ashok Chavan Join BJP)

याप्रसंगी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. पदाची अपेक्षा न ठेवता चव्हाण भाजपात आले आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

काँग्रेसला रामराम केल्यानंतर पुढील ४८ तासांत आपण आपली राजकीय वाटचाल स्पष्ट करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले होते. सोमवारी राजीनामा दिल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली राजकीय वाटचाल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. (Ashok Chavan Join BJP)

Ashok Chavan Join BJP: मी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय

"आज माझ्या राजकीय कारकिर्दीची एक नवीन सुरुवात आहे. मी आज त्यांच्या कार्यालयात औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करत आहे," अशी घोषणा काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांनी यापूर्वी 'एएनआय'शी बोलताना केली होती. यानुसार त्यांनी आज मी १२-१२.३० च्या सुमारास माझ्या राजकीय कारकिर्दीचा एक नवीन प्रवास सुरू करणार आहे, मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्‍याचेही स्पष्ट केले होते.  तसेच महाराष्ट्राच्या रचनात्मक विकासासाठी आम्ही काम करू अशी मला आशा आहे, असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. यानंतर त्यांनी भाजप कार्यालयात अधिकृतपणे पक्षप्रवेश केला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT