Latest

इस्रायल-हमास युद्धाबाबतच्या भारताच्या धोरणांवर प्रियंका गांधी संतापल्या; म्हणाल्या, ‘देशांच्या तत्वांविरोधात’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या विशेष अधिवेशनात गाझामध्ये मानवतावादी आधारावर युद्धबंदीसाठी मांडलेला ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला. मात्र, भारत, ब्रिटन, कॅनडा, जर्मनीसह ४५ देशांनी मतदानापासून दूर राहिले आहेत. यावर आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा संतापल्या आहेत. भारताच्या या भूमिकेबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. भारताच्या या वृत्तीची मला लाज वाटत असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

प्रियंका गांधी म्हणाल्या, गाझामध्ये सात हजार लोक मारले गेल्यानंतरही हिंसाचाराचे चक्र थांबलेले नाही. या मृतांमध्ये तीन हजार निष्पाप मुले होती. असा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा नाही जो या युद्धात मोडला गेला नाही. कोणताही कायदा नाही ज्याची पायमल्ली झाली नाही. माणुसकीचा प्रत्येक नियम मोडीत काढला जात असताना मूकपणे भूमिका न घेणे चुकीचे आहे.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT