Latest

आर्यन खानचा जीव ‘पार्टी’मध्ये परतला, नाईट क्लबमधील Video व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा तो नाईट क्लबमध्ये गेल्याचे दिसते. त्याचा नाईट क्लबमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) क्रुझवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले होते. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. नुकतेच न्यायालयाने त्याचा जप्त केलेला पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत. ड्रग्ज प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर आर्यन खान पुन्हा एकदा आयुष्यात परतला आहे. आर्यन नाईट क्लबमध्ये दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सुपरस्टारचा मुलगा मित्रांसोबत क्लबमध्ये दिसला. व्हायरल व्हिडिओमध्ये, आर्यन खान आपला मास्क काढतो आणि ड्रिंक घेतो आणि नंतर पुन्हा मास्क घालतो असे दिसून येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान लवकरच रेड चिलीज एंटरटेनमेंटने बनवलेल्या वेब सीरिजमधून पदार्पण करणार आहे.

शाहरुख खान नेहमीच स्पष्ट करत असे की सुहाना खानप्रमाणे आर्यन खानला अभिनयात रस नाही. त्याला दिग्दर्शक व्हायचे आहे. स्टार किड्सचे फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे. ड्रग प्रकरणादरम्यान त्याला त्याच्या चाहत्यांचा आणि इंडस्ट्रीतील लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला.

SCROLL FOR NEXT