मुंबई : पुढारी वृत्तसेवा – बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Drugs Case) अन्य काही आरोपींना कॉर्डीलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून क्लीनचीट देण्याच्या एनसीबीच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती याचिकाकर्त्या विद्यार्थ्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर या विद्यार्थ्याने ही याचिका मागे घेतली. (Aryan Drugs Case)
एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठ ही याचिका जनहित याचिका म्हणून कशी काय दाखल होऊ शकते? असा सवाल उपस्थित केला. केवळ प्रसिद्धीसाठी केलेली याचिका आहे. ती योग्य कशी काय आहे ते पटवून द्या, अन्यथा मोठ्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागेल. असा सज्जड दम दिल्यानंतर याचिका मागे घेण्यात आली.
कॉर्डेलिया क्रूज पर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने २ ऑक्तोबर, २०२१ रोजी छापा टाकला होता. यानंतर आर्यन खानसह आठ लोकांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं.