Latest

Utpal Parrikar : सीएम अरविंद केजरीवालांकडून उत्पल पर्रीकरांना पुन्हा एकदा ऑफर

backup backup

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : भाजपने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना तिकीट नाकारल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांना पुन्हा एकदा पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. (Utpal Parrikar)

याबाबत त्यांनी ट्विट करून त्यांना आपतर्फे उमेदवारी देऊ असे आश्वासन दिले आहे. त्यांनी लिहले आहे की , गोव्यातील जनता भाजपच्या वापरा आणि फेकून द्या या नीतीमुळे नाराज आहेत.

मनोहर पर्रिकरांच्या कुटुंबासोबतही भाजप असेच वागत आहे. मला नेहमीच मनोहर पर्रिकरांबाबत आदर होता. उत्पल यांचे आपमध्ये स्वागत आहे. ते पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात.

याआधी त्यांनी १६ रोजी पणजीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतही उत्पल यांना आपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यांच्या आवाहनानंतर आपचे पणजीचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी पक्षाने निर्णय घेतल्यास माघार घेण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

Utpal Parrikar : उपमुख्यमंत्र्यांच्या पत्निचे तिकीट नाकारल्याने बंडाचे पाऊल

सांगेत सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांचा पत्ता कट केला आहे. सावित्री कवळेकर यासुद्धा भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या जाहीर प्रचाराची सुरुवातसुद्धा केली होती. (Goa Election 2022)

भाजपच्या उमेदवारीवर दावा करताना त्यांनी मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शनही केले होते. पक्षश्रेष्ठींनी फळदेसाई यांच्या बाजूने झुकते माप दिल्यामुळे सावित्री कवळेकर भाजपच्या विरोधात बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणारच, असा इशारा त्यांनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT