Latest

‘मी दहशतवादी नाही’ : केजरीवालांचा तिहार कारागृहामधून नवा संदेश

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माझे नाव अरविंद केजरीवाल आहे आणि मी दहशतवादी नाही, असा नवा संदेश दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे, अशी माहिती आम आदमी पाटीचे खासदार संजय सिंह यांनी दिली.

संजय सिंह यांनी आज (दि. १६) पत्रकार परिषदेत सांगितले की, "देशासाठी आणि दिल्लीतील जनतेसाठी कुटुंबातील मुलगा आणि भावाप्रमाणे काम करणाऱ्या अरविंद केजरीवाल हे तिहार कारागृहात आहेत. यांनी तुरुंगातून 'माझे नाव अरविंद केजरीवाल आहे आणि मी दहशतवादी नाही', असा संदेश दिला आहे.

पंजाबचे मुख्‍यमंत्री भगवंत मान यांना भेटायला गेले होते. यावेळी त्‍यांना केवळ काही अंतर ठेवून (ग्लासमधून)भेटायला लावले. यावरून पंतप्रधानांच्या मनात अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल द्वेषाची भावना असल्याचे स्पष्ट होते. केंद्र सरकारने केजरीवालांवर कितीही दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केला तरी ते तितकाच वेगाने परत येतील. सोमवारी भगवंत मान यांनी केजरीवालांची भेट घेतली. यानंतर मान भावूक झाले. ही आपल्या सर्वांसाठी भावनिक बाब आहे परंतु भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी ही लाजिरवाणी बाब आहे, असेही संजय सिंह यावेळी म्‍हणाले.

सोमवारी तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांची भेट घेणारे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आपचे राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी सांगितले की, केजरीवाल प्रत्येक आठवड्यात दोन मंत्र्यांना तुरुंगात बोलावतील. त्यांच्या विभागातील कामाच्या प्रगतीचा आढावा घेतील. केजरीवाल यांना अटक झाल्यापासून भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT