Latest

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांनी दिल्लीत घेतले हनुमानाचे दर्शन

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची काल (दि.११) सायंकाळी ७ वाजता अंतरिम जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर आजपासून ते लोकसभा निवडणुक प्रचारात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सहपत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हनुमानजींच्या आशीर्वादाने, करोडो लोकांच्या प्रार्थना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या न्यायाने तुम्हा सर्वांमध्ये परतताना मला खूप आनंद होत आहे".

Arvind Kejriwal : 'आज भेटू , तुम्ही सर्वांनी यावे'- दिल्लीवासियांना केजरीवालांचे आव्हान

  • सकाळी 11 वाजता – हनुमान मंदिर, कॅनॉट प्लेस
  • दुपारी 1 वाजता – पत्रकार परिषद, पक्ष कार्यालय
  • दुपारी 4 वाजता – रोड शो (दक्षिण दिल्ली – मेहरौली)
  • संध्याकाळी 6 वाजता – रोड शो (पूर्व दिल्ली – कृष्णा नगर)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT