Latest

artificial intelligence भविष्यात मानवजातीचा नायनाट करेल, गुगल आणि ऑक्सफर्डच्या शास्त्रज्ञांचा इशारा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी डेस्क : कृत्रिम बुद्धिमत्तेचे (artificial intelligence) आधुनिक रुप पृथ्वीवरून मानवजातीला नष्ट करू शकते, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. गुगल डीपमाइंड (Google DeepMind) आणि ऑक्सफर्डच्या (Oxford researchers) संशोधकांनी यावर लेखन केलेले असून यावरील एक शोधनिबंध ऑगस्टच्या अखेरीस AI मासिकात प्रसिद्ध झाला आहे. यामुळे भविष्यात प्रगत मशीन्स आणि त्यांची निर्मिती केलेल्यांनी सेट केलेले नियम तोडले जातील आणि ते मर्यादित संसाधने किंवा उर्जेसाठी स्पर्धा करतील. (artificial intelligence may wipe out humanity from the Earth said Google and Oxford scientists)

हे महत्वाचे आहे की जनरेटिव्ह अॅडव्हर्सरियल नेटवर्क्स (GANs) सध्या सर्वात यशस्वी AI मॉडेल आहेत. नवीन शोधनिबंधातून असे सूचित करण्यात आले आहे की भविष्यात अशा प्रकारचे नेटवर्क्स त्या त्या वेळी काही महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवतील. चिंतेची बाब म्हणजे त्यांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन दिले जाऊ शकते ज्यामुळे मानवतेचे गंभीर नुकसान होईल.

सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता महामार्गांवर कार चालवू शकते, वेबसाइट्समध्ये बदल करु शकते, कलाकृती तयार करू शकते आणि इतर अनेक गोष्टी करू शकते. पण याचे इतके फायदे असूनही अनेक शास्त्रज्ञ आणि विश्लेषकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी अस्तित्वासाठी धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. नवीन शोधनिबंधातून कृत्रिम बुद्धिमत्ता मानवतेच्या अस्तित्वासाठी कशी धोकादायक ठरू शकतो हे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे.

मायकेल कोहेन यांनी ट्विटमधून याची माहिती दिली आहे. मायकेल कोहेन हे शोधनिबंधाच्या सहलेखकांपैकी एक आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता त्यांच्या पुरस्कारांच्या तरतूदीमध्ये हस्तक्षेप करत आहे, ज्याचे भविष्यात घातक परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या गटाचा आणखी एक मोठा दावा असा आहे की भविष्यात ऊर्जा संकटदेखील समस्या निर्माण करू शकते जेथे artificial intelligence विरुद्ध मानव असा संघर्ष पहायला मिळू शकतो.

कोहेन यांनी पुढे ट्विट करत म्हटले आहे की हे केवळ शक्य नाही, ते होण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे एलियन जीवसृष्टी या पृथ्वीचा ताबा घेईल या भीतीप्रमाणेच भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता मानवतेचा नाश करणार असल्याची चिंता शोधनिबंधातून अधोरेखित करण्यात आली आहे.

प्रगतीच्या एका टप्प्यावर पोहोचलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेला संभाव्य धोका म्हणून संबोधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही DeepMind संशोधकांनी आधीच AI सोल्यूशन्सला the big red button असे संबोधून अशा परिस्थितीपासून बचाव करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT