Latest

Katrina Kaif : कॅटरिना कैफ प्रेग्नेंट?, वनसाईड ओढणीनं लपवलंय बेबीबंप (video)

अनुराधा कोरवी

पुढारा ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफनं अभिनयासोबत तिच्या वेगवेगळ्या हटके स्टाईलने चाहत्यांना नेहमीच भुरळ घातलीय. कॅटरिनाने २०२१मध्ये अभिनेता विक्की कौशलशी लग्न केले. लग्ननंतर कॅटरिना आणि विक्कीच्या गुडन्यूजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अनेक वेळा कॅटरिना प्रेग्नंट असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर बॉलिवूड अभिनेना सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या ईद पार्टीत कॅटरिना ( Katrina Kaif ) स्पॉट होताच पुन्हा ती प्रेग्नेंट असल्याची चर्चााना उधान आले आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत्त खुलासा झालेला नाही.

अर्पिता खानच्या ईद पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिनाने ( Katrina Kaif ) दिमाखात हजेरी लावली. यावेळी कॅट सोनेरी- व्हाईट रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसली. कॅट कारमधून खाली उतरते आणि पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला हटके पोझ देते. अनारकली ड्रेसवरील भरगच्च डिझाईन, कानात इअररिग्स, पायात बुट, दुप्पटा, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला आहे.

कॅटरिनाचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. फोटोला पोझ देताना कॅटने तिची ओढणी वन साईटने घेतली आहे आणि ती सारखे- सारखे पोटावर हात ठेवताना दिसतेय. यावरून चाहत्यांनी कॅट ओढणी आणि तिच्या हाताने बेबीबंप लपवत असल्याचे म्हटलं आहे. या घटनेवरून पुन्हा एकदा प्रेग्नेंट असल्याचे चर्चांना उधान आलं आहे. परंतु, अद्याप याबाबतचा कोणतीही अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

कॅटरिनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'कॅट प्रेग्नंट आहे काय?', 'ती प्रेग्नंट आहे?'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. कॅटरिना शेवटची 'फोन भूत' या चित्रपटात दिसली होती. कॅटकडे विजय सेतुपतीचा 'पाइपलाइन' आणि सलमान खानचा 'टायगर ३' चित्रपट आहेत. 'टायगर ३' या चित्रपटात कॅटरिना झोयाची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT