Latest

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची धुलाई! दिल्लीचा गोव्यावर विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली आणि गोवा यांच्यात 20 ऑक्टोबर रोजी सामना झाला. या सामन्यात गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 131 धावा केल्या. ज्यामध्ये दीपराज गावकरने 40 धावांची सर्वोत्तम खेळी केली. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाने हा सामना 6 विकेटने जिंकला. गोव्याच्या या पराभवाचा संबंध अर्जुन तेंडुलकरशी (Arjun Tendulkar) जोडला जात आहे. जो या सामन्यात सर्वात महागडा ठरला.

दिल्ली आणि गोवा यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीचा संघ खूप मजबूत दिसत होता. अपेक्षेप्रमाणे त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे या सामन्यात दिल्लीने गोव्याचा 6 विकेटने पराभव केला. तर गोव्याची कामगिरी पूर्णपणे विरुद्ध होती.

गोव्याच्या कमकुवत गोलंदाजीमुळे दिल्लीचे खेळाडूं चमकदार फलंदाजी करताना दिसले. त्याचवेळी या सामन्यात भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने (Arjun Tendulkar) गोलंदाजी करताना धावा देणगी स्वरुपात वाटल्या. अर्जुनने 3 षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली. या दरम्यान त्यांचा इकोनॉमी रेट 9.30 वर राहिला. त्यांच्याशिवाय लक्ष्य गर्गने 10.30 च्या खराब इकोनॉमी रेटने धावा दिल्या. त्यामुळे हा सामना गोव्याच्या हातातून निसटला.

अर्जुन फलंदाजीतही फ्लॉप… (Arjun Tendulkar)

वास्तविक अर्जुन तेंडुलकर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीविरुद्ध क्रमांक-3 वर फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात त्याने बॅटने खराब कामगिरी केली. टी 20 फॉरमॅटमध्ये अर्जुनला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवणे या संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता. पण तो संघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. अर्जुनने 12 चेंडूत 15 धावांची संथ खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार आला. अर्जुनने 125 च्या संथ स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि 15 धावा करूनच तो पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधीही 14 ऑक्टोबरला हैदराबादविरुद्ध तो केवळ 2 धावांवर बाद झाला होता. या सामन्यापूर्वी 7 टी 20 सामन्यांमध्ये त्याला केवळ 5 धावा करता आल्या होत्या.

अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही. चाहते त्याला सतत आयपीएल सामन्यात खेळवण्याची मागणी करत असतात. अर्जुन सध्या युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. असे असूनही त्याच्या गोलंदाजीत आतापर्यंत फारशी सुधारणा झालेली नाही. दिल्लीविरुद्धच्या आजच्या सामन्यातील खराब गोलंदाजीवरून याचा अंदाज येऊ शकतो. अशा परिस्थितीत तो आयपीएलमधील पहिला सामना कधी खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यापूर्वीच्या सामन्यांमध्ये अर्जुनची चमकदार कामगिरी, पण…

गोव्यासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये अर्जुनने (Arjun Tendulkar) गोलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली आहे. 18 ऑक्टोबर रोजी गोवा आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोवा संघाला विजय मिळवून देण्यात अर्जुनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्‍याने त्‍याच्‍या 4 ओव्‍हरच्‍या स्‍पेलमध्‍ये दमदार गोलंदाजी केली आणि केवळ 25 धावा देत 2 महत्‍त्‍वाच्‍या विकेट घेतल्या. तसेच गोवा आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 4 षटकात 2.50 च्या इकॉनॉमीसह 4 बळी घेतले होते. यादरम्यान त्याने एक निर्धाव षटकही फेकले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT