Latest

Apple ने रद्द केला इलेक्ट्रिक कार प्रोजेक्ट! २ हजार कर्मचाऱ्यांचे काय होणार?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : स्मार्टफोनची दिग्गज कंपनी ॲपलने (Apple) जवळजवळ एक दशकाच्या कामानंतर त्यांचा महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोजेक्ट रद्द केला आहे. ब्लूमबर्गच्या एका वृत्तानुसार, अॅपलने ऑटोनोमस कार विकसित करण्याचे "प्रोजेक्ट टायटन"चे काम थांबवले आहे. Apple ने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी २ हजार कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बैठकीत इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोजेक्ट रद्द करत असल्याबाबत माहिती दिली.

चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ विल्यम्स आणि प्रोजेक्ट हेड केविन लिंच यांनी १५ मिनिटांपेक्षा कमी वेळ चाललेल्या बैठकीदरम्यान टीमला याबाबत सांगितले. एलन मस्क यांच्या टेस्लाचा प्रतिस्पर्धी म्हणून ॲपलच्या कार प्रोजेक्टकडे पाहिले जात होते. ॲपलने २०१४ मध्ये पहिल्यांदा "प्रोजेक्ट टायटन" कार प्रकल्पावर काम सुरू केले होते.

ॲपलचे उच्चपदस्थ अधिकारी आणि कंपनी बोर्ड यांनी अनेक महिन्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. ॲपलने हाय-प्रोफाइल प्रोजेक्ट रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ॲपलने या प्रकल्पावर काम करण्यासाठी टेस्लाच्या माजी ऑटोपायलट सॉफ्टवेअर संचालकासह अनेक प्रमुख कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

ॲपल कार प्रकल्प बंद होत असल्याने या प्रकल्पावर काम करणाऱ्या २ हजार टीमचे काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित प्रकल्पावर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांसमोर नोकरकपातीची टांगती तलवावर आहे.

Apple कार टीममधील एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना ॲपलच्या इतर विभागांमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग हार्डवेअर, कार इंटिरियर्स आणि एक्सटीरियर्स आणि वाहन इलेक्ट्रॉनिक्सवर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये नवीन नोकऱ्या शोधव्या लागणार आहेत. त्यांना इतर विभागात सामावून न घेतल्यास त्यांना नोकरी सोडण्यास सांगितले जाईल. काही कर्मचाऱ्यांना ते नोकरी सोडून जाणार असल्याचे कळविले असल्याचे वृत्तात पुढे म्हटले आहे. तर काही कर्मचाऱ्यांना ॲपलच्या जनरेटिव्ह AI (GenAI) प्रोजेक्टमध्ये हलवण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT