Latest

हत्या प्रकरणी आंध्रचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकांना CBI कडून अटक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे चुलते वायएस भास्कर रेड्डी यांना सीबीआयने आज (दि.१६) अटक केली. माजी खासदार विवेकानंद रेड्डी (AP CM Jagan Mohan Reddy) यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी स्वतःसाठी किंवा जगन मोहन रेड्डी यांची बहीण किंवा आई वायएस विजयम्मा यांच्यासाठी कडप्पा मतदारसंघाचे तिकीट मागत होते. दरम्यान त्यांची घरात घुसून अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी वायएस भास्कर रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे.

माजी खासदार विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी (AP CM Jagan Mohan Reddy) यांचे काका होते. १५ मार्च २०१९ च्या रात्री राज्य विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी, पुलिवेंडुला येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची हत्या झाली होती.

सध्या विवेकानंद रेड्डी यांच्या कडप्पा लोकसभा जागेचे प्रतिनिधित्व वायएस अविनाश रेड्डी (AP CM Jagan Mohan Reddy) करतात, जे भास्कर रेड्डी यांचे पुत्र आहेत. सीबीआयने भास्कर रेड्डी यांना त्यांच्या पुलिवेंदुला भागातील राहत्या घरातून अटक केली आहे. अटकेची माहिती मिळताच भास्कर रेड्डी यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

एसआयटीने प्रथम या प्रकरणाचा तपास केला, त्यानंतर जुलै २०२० मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी स्वतःसाठी किंवा जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला किंवा जगन यांची आई वायएस विजयम्मा यांच्यासाठी कडप्पा लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागत होते. परंतु, या दरम्यानच ६८ वर्षीय विवेकानंद रेड्डी यांची घरात घुसून अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेच्या वेळी माजी खासदार घरात एकटेच होते. एसआयटीने प्रथम या प्रकरणाचा तपास केला आणि जुलै 2020 मध्ये त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT