Latest

धोक्याची घंटा! गुजरातच्या दुप्पट असलेला अंटार्कटिकातील ‘हा’ हिमखंड वेगाने विरघळतोय!

मोहसीन मुल्ला

जागतिक तापमान वाढ, हवामान बदलाचे परिणाम आता आपल्या समोर आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीठ अशा किती तरी घटनांत वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. अंटार्कटिकातील हिमखंड विरघळून समुद्राच्या पातळीत वाढ होणे हे अजून एक मोठे संकट जागतिक तापमान वाढीमुळे आपल्या समोर उभे ठाकले आहे. यासंदर्भात संशोधकांनी आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे.

अंटार्कटिकामध्ये असलेला Thwaites Glacier हा हिमखंड फार वेगाने विरघळत आहे. हा हिमखंड गुजरात राज्याच्या दुप्पट आकाराचा असल्याने हा हिमखंड विरघळला तर समुद्राची पातळीतही वाढ होणार आहे. या हिमखंडाच्या आकारामुळेच याला Doomsday Glacier असेही म्हटले जाते. Doomsdayचा अर्थ जगाच्या विनाशाचा दिवस असा आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होणार आहे, त्यातील बरीचशी वाढ या हिमखंडाच्या विरघळण्याने होणार आहे. जर हा हिमखंड अचानक समुद्रात कोसळला तर समुद्राच्या पातळीत २५ इंच इतकी वाढ होईल , असे संशोधकांनी म्हटले आहे. तर समुद्राच्या पातळीत २ ते १० फूट इतकी वाढ होईल, असा अंदाज आहे. याचे परिणाम न्युयॉर्क शहरापर्यंत दिसतील, तसेच इतर किनारपट्टीच्या बऱ्याच भागांत पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

हा हिमखंड सध्या दरवर्षी २.१ किलोमीटर इतक्या वेगाने विरघळत आहे. २०११ ते २०१९ या कालावधित जो अभ्यास झाला होता, त्यापेक्षा हा वेग जास्त आहे. असे संशोधकांनी म्हटले आहे. यासंदर्भांतील रिसर्च पेपर नेचर जिओसायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT