Latest

Antarctica Glacier : अंटार्क्टिकातील ‘प्रलयंकारी’ ग्लेशियरचा वितळण्याचा वेग धीमा

Arun Patil

न्यूयॉर्क : अंटार्क्टिकामधील एक ग्लेशियर 'डूम्सडे ग्लेशियर' (Antarctica Glacier) म्हणूनच ओळखले जाते. हे भले मोठे ग्लेशियर जर वितळले तर संपूर्ण जगात प्रलय येऊ शकेल असे म्हटले जाते व त्यामुळेच त्याला हे नाव आहे. अर्थात त्याचे खरे नाव थ्वेटस् ग्लेशियर असून ते पश्चिम अंटार्क्टिकामध्ये आहे. त्याचा वितळण्याचा वेग अनुमानापेक्षा पुष्कळ धीमा असल्याचे आता आढळून आले आहे.

याबाबतच्या दोन संशोधनांची माहिती 'नेचर' (Antarctica Glacier) या नियतकालिकात प्रसिदद्ध करण्यात आली आहे. हे ग्लेशियर एखाद्या कटोर्‍यासारख्या आकाराच्या खडकाळ जमिनीवरील उताराच्या भागात आहे. त्याच्या कडा समुद्राच्या दिशेने वर गेलेल्या आहेत. याचा अर्थ या ग्लेशियरमधील बहुतांश बर्फ हा समुद्रसपाटीपासून खाली आहे. हे ग्लेशियर वेगाने आकसले तर त्याच्यामुळे समुद्राच्या पातळीत 1.6 फुटांची वाढ होऊ शकते.

न्यूझीलंडच्या कँटेरबरी युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. इंग्लंड आणि अमेरिकेतील संयुक्त प्रयत्नांचा एक भाग म्हणून या ग्लेशियरबाबतचे (Antarctica Glacier) हे संशोधन करण्यात आले. त्यामध्ये संशोधकांनी 1925 फूट खोल ड्रील करून त्यामधील बर्फाचे नमुने गोळा केले होते. त्यावरून त्याचे तापमान, मिठाचे प्रमाण, खालील भागातील पाण्याच्या प्रवाहाचा वेग आणि वितळण्याचा वेग यांचा अभ्यास करण्यात आला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT