Latest

Israel-Hamas War : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा आणखी एक प्रमुख म्होरक्या ठार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलने आज (दि. १७) गाझाच्या भागात हवाई  हल्ला केला. या हल्ल्यात डझनभर लोक ठार झाले. दरम्यान, हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याविरोधात गाझा परिसराला इस्रायलने वेढा घातला. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हमासचा आणखी एक प्रमुख नेता ठार झाला  आहे. (Israel-Hamas War)

हमासच्या लष्कराने सांगितले की, मध्य गाझा पट्टीमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचा आणखी एक प्रमुख अतिरेकी कमांडर आज (दि. १७) ठार झाला आहे. आयमन नोफल असे या प्रमुख अधिकारीचे नाव होते.

यापूर्वी इस्रायलने गाझा पट्टीवर रविवारी (दि. १५) हवाई ( israeli air force) हल्ला केला होता. या हल्ल्यात हमास या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मारला गेला होता. बिलाल-अल-केद्रा असे त्याचे नाव आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT