Latest

Australian Open : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आणखी एक धक्कादायक निकाल; ‘ही’ महिला खेळाडू बाहेर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मध्ये पुरुषांपाठोपाठ आता महिला एकेरीतही उलथापालथ सुरुच आहेत. जगातील नंबर वन महिला टेनिसपटू इगा स्वियतेक (Iga Świątek) ऑस्ट्रेलिय ओपनमधून (Australian Open) बाहेर पडली आहे. रविवारी महिला एकेरीच्या चौथ्या फेरीत तिला एलेना रिबनिका हिने तिचा ४-६, ४-६ असा पराभव केला. महिला एकेरीत पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला पराभूत करून रियाबकिनाने मोठा उलटफेर केला आहे. या स्पर्धेत स्वियतेक ही अव्वल मानांकित महिला खेळाडूही होती.

यंदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या आधी पुरुष एकेरीत अव्वल मानांकित राफेल नदाल आणि द्वितीय मानांकित कॅस्पर रुड हे बाहेर पडले होते. या दोघांशिवाय अँडी मरे आणि डॅनिल मेदवेदेव हेदेखील या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. १ तास २९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात कझाकस्तानच्या रिबनिकाने शानदार खेळ करत स्वियतेकला स्पर्धेतून बाहेर केले. रिबनिका ही यंदाची बिम्‍बडन स्‍पर्धेतील महिला एकेरीतील विजेती आहे. आता आस्‍ट्रेलियन ओपन विजेतेपदासाठी तिने आगेकूच केली आहे. गतवर्षी यूएस ओपन जिंकणाऱ्या रिबनिकाने सांगितले की, स्वियतेक विरूध्दचा सामना कठीण होता. (Australian Open)

कोको गॉफही पराभूत

महिला एकेरीत चढ-उतार सुरूच आहेत. सातव्या मानांकित कोको गॉफलाही सरळ सेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. १७व्या मानांकित जेलेना ओस्टापेन्कोने तिचा ७-५, ६-३ अशा फरकाने पराभव केला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT