Latest

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेनं मनारा चोप्रावर फेकली कॉफी (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस १७' ( Bigg Boss 17 ) शोमधून चाहत्यांच्या घराघरात पोहोचला आहे. या शोत दररोज नवनविन ट्विस्ट समोर येत आहेत. सध्या बिग बॉस घरात वेगवेगळ्या टास्कसोबत स्पर्धकांना नॉमिनेशन करण्याचे काम सुरू आहे. या टास्कदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने मनारा चोप्रावर कॉफी फेकली आहे. याचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या 

छोट्या पडद्यावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'बिग बॉस १७' ( Bigg Boss 17 ) शो खूपच चर्चेत असतो. या शोत दररोज नवनिवन टास्कचा सामना स्पर्धकांना करावा लागतो. आता या शोत घरातील स्पर्धकांना नॉमिनेशन करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. दरम्यान शोचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या शोमध्ये काही दिवसांपूर्वी पती विकी जैनसोबत बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोंखडे पोहोचली होती. आता या शोत नॉमिनेशन टास्कदरम्यान अंकिताने मनारा चोप्रावर कॉफी फेकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

या प्रोमोमध्ये टास्कमध्ये स्पर्धकांना नॉमिनेट करताना त्यांच्यावर कॉफी फेकण्याचे टास्क देण्यात आला होता. दरम्यान अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, ऐश्वर्या शर्मा यांच्यासह सर्व स्पर्धक एकमेकांवर कॉफी फेकताना दिसले. दरम्यान अंकिताने मनारा चोप्रावर तिच्या चुका सांगत कॉफी फेकली. तर दुसऱ्यावेळी मनारानेही अंकिताच्या चुका सांगत तिच्यावर कॉफी फेकली आहे. या भागात सर्व घरातील स्पर्धक एकमेंकावर कॉफी फेकतानाही दिसले आहेत.

दिवसेंदिवस 'बिग बॉस १७' हा शो मनोरंजक वळणावर येतो. आणि घरातील स्पर्धकांना हटके टास्क खेळताना जीवाची बाजी लावावी लागते. या शोत पुढे नविन कोणता टास्कचा सामना स्पर्धकांना करावा लागणार आहे? यांची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

SCROLL FOR NEXT