Latest

Anjali Damania on Bhujbal | अखेर भुजबळ नमले! फर्नांडिस कुटुंबाला न्याय, अंजली दमानियांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबाला जमिनीसंदर्भातील व्यवहारात फसवल्याची तक्रार केली होती. यावरून त्यांनी छगन भुजबळ यांच्या कुटुंबावर फवणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी या कुटुंबाला न्याय मिळाल्याचे दमानिया यांनी सांगितले. यासाठी त्यांनी भुजबळ कुटुंबियांनी थकबाकी भरपाई करण्यास भाग पाडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे देखील आभार मानले आहे. (Anjali Damania on Bhujbal)

अंजली दमानिया यांनी सांताक्रुझ पश्चिम येथील फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी फसवून इमारत बांधल्याचा आरोप केला. फर्नांडिस कुटुंबाला भुजबळ यांनी जमिनीचे कोणतेही मूल्य दिली नव्हते. यावरून दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत, छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते. यानंतर भुजबळ कुटुंबीयांनी तब्बल २० वर्षांनंतर अखेर डोरीन फर्नांडिस यांची थकबाकी भरली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Anjali Damania on Bhujbal)

78 वर्षीय डोरीन फर्नांडिस या कुटुंबाच्या मालकीच्या घरासाठी न्याय मिळवण्यासाठी लढा देत होत्या. मला सांगायला आनंद होत आहे की, भुजबळ कुटुंबीयांनी तब्बल २० वर्षांनंतर अखेर डोरीन फर्नांडिस यांची थकबाकी भरली आहे. डोरीनला आता तिचा पूर्ण वाटा मिळाला आहे. त्यामुळे 78 वर्षीय आईला आता आपल्या 3 ऑटिस्टिक मुलांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. (Anjali Damania on Bhujbal)

मी भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढाया लढल्या आहेत. पण या लढतीतून मला खूप मोठे समाधान मिळाले. मी गेले 10 दिवस देशाबाहेर होतो त्यामुळे ही बातमी कळवायला विलंब झाला. असे म्हणत त्यांनी या संदर्भातील पोस्ट त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) केली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT