Latest

संतापलेल्या विद्यार्थ्यांनी चार एसटी बस रोखल्या ; कमी फेऱ्यांमुळे संताप

अमृता चौगुले

कडूस : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपासून राजगुरुनगर- साबुर्डी एसटी बस कडूस स्टँडला न येता परस्पर खेड व साबुर्डीला जात आहे. तसेच कडूस एसटीच्या फेऱ्या कमी येत असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला.  यावेळी गावात एकाच वेळी विद्यार्थ्यांनी चार एसटी बस रोखून रोखल्या. राजगुरूनगर महामंडळाला अनेकदा विनंती करूनही अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केला. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी चार बस रोखून धरल्या. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र तिच योजना नीट विद्यार्थ्यांपर्यत पोहोचली नाही, तर त्या योजनेचे सार्थक होत नाही. अशीच स्थिती कडूस परिसरातील विद्यार्थ्यांची झाली आहे.

राजगुरूनगर येथे शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने कडूस परिसरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राजगुरूनगरला शिक्षण घेण्यासाठी एसटीने जातात. खेड ही मोठी बाजारपेठ असल्याने अबालवृद्ध प्रवाशांसह शेतकरी नागरिक खेड- कडूसला मोठ्या संख्येने जात असतात. मात्र एसटी बस स्टँडला न येता परस्पर गावाच्या वरील बाजूस असणाऱ्या चौकातून थेट जात असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एसटी बस रोखली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT