Latest

Angarki Chaturthi : अंगारकीसाठी सिद्धिविनायक मंदिरात जय्यत तयारी, सोमवारी मध्यरात्रीपासून मंदिर दर्शनासाठी खुले

backup backup

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, Angarki Chaturthi : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोमवारी (९ जानेवारी) मध्यरात्री १.३० पासून दर्शनाला सुरुवात होणार आहे.

Angarki Chaturthi : नव्या वर्षातील अंगारकी संकष्टी मंगळवारी १० जानेवारी रोजी येत आहे. संकष्टीनिमित्त मोठ्या प्रमाणात मंदिरात भाविकांची गर्दी होते. लाखो भाविक रांगा लावून दर्शन घेतात. भाविकांना श्री दर्शन सुकर व्हावे यासाठी पोलीस आणि मंदिर न्यास प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

Angarki Chaturthi : महिला आणि पुरुष भाविकांसाठी विशेष रांगा, त्याचबराबेर दोन प्रवेश- द्वारांची तसेच रांगेकरिता मंडप व रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येत असलेल्या भाविकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू मौल्यवान वस्तू, पर्स, पूजा साहित्य आणू नये, असे आवाहनही न्यासाने केले आहे.

Angarki Chaturthi : रांग इथून सुरु होणार

पुरुष भाविकांकरिता रचना संसद (शाह आणि सांधी) येथून प्रवेश व महिला भाविकांकरिता सिल्व्हर अपार्टमेंट येथून प्रवेश देण्यात येतील.
दुरुन दर्शनाची व्यवस्था आगार बाजार येथून एस. के. बोले मार्ग, व श्रीसिध्दिविनायक दुरून श्री सोसायटीच्या प्रवेशद्वारातून करण्यात आली आहे.

भाविकांच्या सोयीकरिता मोफत चप्पल स्टँडची व्यवस्था मंडपातच करण्यात येणार आहे. विकलांग, गरोदर महिला, वयोवृद्ध व्यक्ती यांना एस. के. बोले मार्ग येथील पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मंडपातून प्रवेश

Angarki Chaturthi : श्रींची महापूजा, नैवेद्य व आरतीच्या वेळा

पहाटे १२.१० वा. ते १.३० वा. काकड आरती व महापूजा • पहाटे ३.१५ वा. ते पहाटे ३.५० वा. पर्यंत आरती
नैवेद्य १२.०५ वा. ते १२.३० वा. सायंकाळी ७.०० वा. धुपारती • रात्रौ ०७.३० वा. ते रात्रौ ०९.३० पर्यंत श्रींची महापूजा, नैवेद्य व आरती

Angarki Chaturthi : श्रींच्या दर्शनाच्या वेळा

सोमवार मध्यरात्रौ १.३० ते पहाटे ३.१५ वाजेपर्यंत
पहाटे ३.५० ते दु. १२.०० वाजेपर्यंत
दु. १२.३० ते रात्रौ ०७.३० वाजेपर्यंत
रात्रौ ०९.३० ते रात्रौ ११.३० वाजेपर्यंत

हे ही वाचा ;

SCROLL FOR NEXT