Latest

YS Sharmila : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांच्या बहिण शर्मिला यांना दिल्लीत अटक

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणामध्ये बीआरएस सरकारविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला (YS Sharmila) यांना मंगळवारी (दि. १४) दिल्लीत पोलिसांनी अटक केली आहे. त्या वायएस जगमोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत.

याबाबत अधिक माहितीनुसार, शर्मिला (YS Sharmila) यांनी सोमवारी (दि. १३) जंतर-मंतरवर कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाच्या कथित घोट्याळ्याची चौकशी करण्याची मागणी करत आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी आज आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनादरम्यान त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

वायएस शर्मिला यांचे तेलंगणा सरकारवरील कथित आरोप

20 ऑक्टोबर 2022 रोजी शर्मिला यांनी प्रथम कालेश्वर यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले होते. शर्मिला यांनी सांगित्यानुसार, "कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्प घोटाळा मोठा आहे कारण हा केवळ आभासी पैसा नाही तर भौतिक पैसा देखील आहे, ज्यामुळे सरकारी तिजोरीवर खर्चाचा बोझामध्ये वाढ होते," असे सांगून त्यामध्ये गुंतलेली रक्कम 1.2 लाख कोटी रुपये आहे. असा आरोप शर्मिला यांनी केला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT