Latest

Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणूक मविआ म्हणूनच लढविणार : अनिल परब

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : Andheri Bypoll : अंधेरी पोटनिवडणूक मविआ म्हणूनच लढविणार आहोत, असे मत शिवसेनेचे माजी मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केलं. महाविकास आघाडीतर्फे सोमवारी (दि. १० ऑक्टो) पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी परब म्हणाले की, ही पत्रकार परिषद घेण्याचे कारण असे की, रमेश लटके यांच्या रिक्त पदाची निवडणूक (Andheri Election) जाहीर केली आहे. या निवडणूकीला आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पाठींबा आहे. गुरूवारी (दि. १३) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. तसेच आज रात्री किंवा उद्या सकाळी चिन्ह मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. आयोग जे चिन्ह देईल ते घेऊन लढेन.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षनाव आणि चिन्ह गोठवले. आगामी  अंधेरी पोटनिवडणूक काही दिवसांवर ठेपलेली असताना ठाकरे गटासाठी हा धक्कादायक निर्णय होता. या निवडणूकीतील शिवसेनेची भूमिका काय असणार हे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आले. मविआ म्हणूनच ही निवडणूक लढवणार असा निर्णय आता शिवनेने दिला. मात्र शिवसेनेचे या निवडणूकीत कोणते चिन्ह असेल याचा निर्णय निवडणूक आयोगाने अद्याप दिलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न अजूनही कायम आहे की ठाकरे गट कोणते नाव आणि कोणते चिन्ह घेऊन आगामी अंधेरी पोटनिवडणूकीला सामोरे जाणार.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT