Latest

Dream Girl 2 मुळे चर्चेत आलेल्या अनन्याचा गोल्डन ड्रेसमध्ये रॅम्प वॉक (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा आगामी 'ड्रीम गर्ल २' ( Dream Girl 2 ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. दरम्यान अनन्या नुकतेच एका फॅशन शोसाठी गोल्डन रंगाच्या आऊटफिटमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली. तिच्या चकाकणाऱ्या सोनेरी ड्रेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या. अनन्याचे रॅम्प वॉक करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. यानंतर चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.

अनन्या पांडेने फॅशन वीकमध्ये गोल्डन स्कर्ट परिधान करून रिमझिम दादूसाठी रॅम्प वॉक केला आहे. वेस्टर्न आउटफिटमध्ये अनन्या स्टेजवर उतरताच सर्वाच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिने सोनेरी कलरचा टुपीस परिधान केला होता. यात तिच्या गोल्डन स्कर्ट पांनाच्या आकाराच्या ड्रेसनं चारचाँद लावलेत. मोकळे केस, इअऱरिग्स, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने अनन्याने लूक पूर्ण केलाय. अनन्याचा हा व्हिडिओ विरळ भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टचा पाऊस पाडलाय. या व्हिडिओला आतापर्यत १२ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या शेवटची 'लायगर' या चित्रपटात दिसली होती. यानंतर तिचा आगामी 'ड्रीम गर्ल २' ( Dream Girl 2 ) चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अनन्या अभिनेता आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT